संगीतावर अधिराज्य गाजविणारा गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम
श्रीपती पंडितराधुला बालसुब्रह्मण्यम या नावाने फारशे लोक परिचित नसतील परंतु एस.पी. बालसुब्रह्मण्यम हे नाव मात्र प्रत्येकाच्या मनी असायलाच हवे. एसपी बालसुब्रह्मण्यम, एसपीबी किंवा बालूू म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय पार्श्वगायक, दूरदर्शनचे प्रस्तुतकर्ता, संगीत दिग्दर्शक, अभिनेता, डबिंग कलाकार आणि मुख्यत्वे तेलुगू भाषेत काम करणारे चित्रपट निर्माता होते. 4 जून त्यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने हा लेखनप्रपंच.
4 जून श्रीपति पंडितराध्याय बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म दिवस. जन्म 1946 सालचा. आध्रं प्रदेश नेल्लोर येथे झाला. वडील एस.पी. सांबमूर्ती किर्तनकार म्हणून परिचित होते. त्यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असा परिवार. पत्नी सावित्री. एस.पी. एक मुलगा पी.बी. चरण आणि मुलगी पल्लवी. बहिण एस.पी. शैलजा ही देखील गायिका. तिचा विवाह शुभलेखा सुधाकर या अभिनेत्यासोबत झाला.
लहानपणापासून एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना इंजिनिअर होण्याची इच्छा होती. परिवाराची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांचा ओढा इंजिनिअरकडे होता. त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजी युनिर्व्हर्सिटीमध्ये प्रवेशही घेतला होता. परंतु नियतिला काही वेगळेच मंजूर होता. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना त्यांची तब्येत इतकी बिघडली त्यांना शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. चेन्नई येथील इन्सिटट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे सहयोगी सदस्य म्हणून ते रुजू झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरु असताना त्यांना संगीताची गोडी लाभली आणि ते अभ्यासाच्या कालावधीतही सुरु ठेवले. 1964 साली तेलुगू कल्चर ऑर्गनायझेशनने आयोजित गायन स्पर्धेत सहभाग नोंदविला. या संगीत स्पर्धेचे समीक्षक होते गीतकार एस.पी. कोदंडपाणीरेड्डी आणि सुप्रसिद्ध गायक घंटशाला. या स्पर्धेत एस.पी. यांनी पहिला क्रमांक पटकाविला आणि तिथूनच त्यांनी आपली कारकिर्द संगीत क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला. एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना वयाच्या 20 व्या वर्षी 1966 साली त्याचे गुरु कोदंडापाणी यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात कारकिर्दीचे पहिले गाणे गायले.
15 डिसेंबर 1966 या दिवशी एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना गायक म्हणून ‘श्री श्री श्री मर्यादा रामण्णा’ या तेलुगू चित्रपटातील गाण्याद्वारे गायन क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.पी. कोदंडपाणी यांनी केले होते. यानंतर पाच दिवसांनी त्यांना तमिळ भाषेतील चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली. 1969 साली गायिका पी. सुशीला यांच्यासोबत गाणे गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर एस. जानकी यांच्यासोबत गायनाची संधी मिळाली.
8 फेब्रुवारी 1981 रोजी त्यांनी सकाळी 9 ते रात्री नऊ या वेळेत गीतकार उपेंद्र कुमार यांनी लेखन केलेले 21 गाणे गायले. हा एक विक्रमच आहे. त्यानंतर एकदिवसात त्यांनी तमिळ भाषेत 19 तर हिंदीत भाषेत 18 गाणे गाण्याचा विकगम केला.
1970 साली तमिळ भाषेतील चित्रपटासाठी एम.एस. विश्वनाथ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यातवेळी एस. पी. यांना एम. जी. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन यांच्यासाठी गाणे गायले होते. याचवेळी त्यांनी पी. सुशीला, एस. जानकी, एल. आर. ईश्वरी या गायिकांसोबत विक्रमी संख्येत गाणे गाण्याचा पराक्रम एस.पी. यांनी केला.
एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी 1980 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली ती शंकरा भरणम् या चित्रपटामुळे. आतापर्यंत निर्माण झालेल्या चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून शंकरा भरणम् या चित्रपटाकडे पाहिले जाते. के. विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील गाण्याला संगीतबद्ध केले होते के.व्ही. महादेवन यांनी. महादेवन यांनी तेलुगू चित्रपटात कर्नाटक संगीताचा उत्कृष्टरित्या वापर केला होता. यानंतर तेलुगू चित्रपटात कर्नाटक संगीताचा वापर वाढला. शास्रीय संगीताचे प्रशिक्षण नसतानाही या चित्रपटात त्यांनी ज्या पद्धतीने गाणे गायले आहे त्याला तोड नाही. या चित्रपटात त्यांनी गायलेल्या गाण्यासाठी पार्श्वगायनाचा पहिलाराष्ट्रीय पुरस्कार एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना मिळाला. त्याच्या पुढील वर्षी हिंदी भाषेसाठी एक दुजे के लिए या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट प्ले बॅक सिंगर म्हणून दुसरा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला.
याचवेळी एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी तेलुगूसोबत दक्षिण भारतीय चित्रपटातील भाषेमध्ये सर्वाधिक गाणे गाण्याचा विक्रम केले. विशेष करून एस. जानकी आणि संगीतकार इलय राजा यांच्यसोबत. 1970 ते 1980 तेलुगू सिनेसृष्टी उद्योग अत्यंत यशस्वी कालावधी म्हणून गणले गेले. यानंतर शास्रीय संगीतावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली. ज्यात सागर संगमम, रुद्रवीणा या दोन चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून इलय राज आणि सर्वोत्कृष्ट पुरुष गायक म्हणून एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळविला होता.
1989 मध्ये एस.पी. बालसुब्रह्मण्यम सलमान खानच्या मैने प्यार कियाचे पार्श्वगायन केले होते. 51 साऊंडट्रॅक चित्रपट म्हणून यशस्वी ठरला सोबत एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. पुढील दशकात त्यांन सलमान खानच्या अधिकाधिक चित्रपटासाठी रोमंटिक आवाज म्हणून प्रसिद्धी मिळविली. हम आपक है कौन हा चित्रपट हिंदीमध्ये सर्वोत्कृष्ट व सर्वाधिक व्यवसाय करणारा चित्रपट ठरला. लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले दीदी तेरा देवर दिवाना हे गाणे खूपच लोकप्रिय झाले. 90 च्या दशकात सलमान खानचे आवाज म्हणजे एस.पी. बालसुब्रह्मण्यम अशी ओळख निर्माण झाली होती. जसे की 70 च्या दशकात राजेश खन्ना यांच्या आवाजाच्या रुपाने किशोर कुमार याचे नाव झाले होते.
1990 ला एस.पी. यांनी विद्यासागर, एम. एम. किरवाणी, हंसलेखा, एसए राजकुमार, ए.आर. रहमान, देवासारख्या नावाजलेल्या संगीतकाराबरोबर काम केले. यामध्ये सर्वात यशस्वी ठरले ते ए.आर. रहमान. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याला खूपच लोकप्रियता लाभली. यात प्रामुख्याने रोजा या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. कन्नड भाषेमध्ये हंसलेखा यांच्याशी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांचे सर्वाधिक यशस्वी ठरले. याचवेळी हिंदी आणि कन्नड भाषेतील पार्श्वगायनासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2013 मध्ये शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटासाठी गायलेले शिर्षक गीत खूपच यशस्वी ठरले. मे 2020 मध्ये भारत भूमी शिर्षक असलेल्या मानवता वादावरील एक गाणे ज्याला संगीतबद्ध केले होते इलय राजा यांनी. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोलीस, डॉक्टर, नर्स, चौकीदार यांच्यावर श्रद्धांजलीच्या रुपाने हिंदी आणि तमिळ भाषेत अनावरण केले.
एका छोट्याशा चुकीमुळे दिग्दर्शक के. बालचंदर या चित्रपटासाठी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांची डबिंग कलावंत म्हणून ओळख होण्यास सुरुवात झाली. त्याची परिणिती मध्ये त्यांनी कमल हसन, रजनीकांत, विष्णुवर्धन, सलमान खान, भाग्यराज, मोहन, अनिल कपूर, गिरीश कर्नाड, जेमिनी गणेश, अर्जुन सरजा, नागेश, कार्तिक, रघुवरन यांच्या आवाजाच्या रुपाने डबिंग कलावंत म्हणून परिचित झाले. कमल हसनचा दशावतारममधील दहा भूमिकेपैकी सात भूमिकेसाठी (महिला चरित्र भूमिकेसाठी) त्यांनी आपल्या आवाजाद्वारे डबिंग केले होते. अन्नमय्या आणि श्री साई महिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डबिंग कलावंत म्हणून नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2012 मध्ये श्री राम राज्यमसाठी नंदमुरी बाळकृष्ण यांच्यासाठी आवाजात तसेच गांधी चित्रपटासाठी बेन किंग्जले यांच्यासाठी आपला आवाजाद्वारे डबिंग केले होते.
यानंतर एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी तेलुगू संगीत रिअॅलिटी शो मध्ये होस्ट आणि परीक्षक म्हणून सहभाग नोंदविण्यात सुरुवात केली. 1996 साला पासून सुरु झालेल्या या रिअॅलिटी शोद्वारे तेलुगू चित्रपटासाठी उषा, कौशल्य, गोपिका पूर्णा, मल्लिकार्जून, हेमचंद्र, एनसी करुणा, स्मिता आदी गायक या रिअॅलिटी शोद्वारे पदार्पण केले होते. तेलुगू पाठोपाठ कन्नड भाषेतील कार्यक्रमाचेही त्यांनी होस्ट केले होते. त्याचप्रमाणे पाडालनी उंदी, यंदरो महानुभावुलू, स्वराभिषेक या शोचे त्यांनी सूत्रसंचालन करून गाण्याची वापर करण्यात आलेल्या संगीताविषयी, साहित्याविषयी, स्वरांच्या उंंचीविषयी विश्लेषण करून सांगत असत. हे तिनही शो तेलुगू भाषेत खूपच लोकप्रिय ठरले होते.
5 ऑगस्ट 2020 रोजी त्यांची तब्येत बिघडल्याने चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर काही दिवसांनी ते कोरोनाग्रस्त झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीविषयी त्याचा मुलगा चरण हा वेळोवेळी सोशल मिडियावरून अपडेट देत होता. 24 सप्टेंबर रोजी त्यांची तब्येत खूपच खालावल्याने ते गंभीर झाल्याचे सांगण्यात आले. महिन्यापेक्षा अधिक कालावधी हॉस्पिटलमध्ये लोटल्यानंतर 25 सप्टेंबर रोजी दु. 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. 26 सप्टेंबर रोजी तिरुवल्लूर जिल्ह्यातील तमराइपाक्कम येथील फॉर्म हाऊसमध्ये त्यांचा राजकीय सन्मानाने अत्यंविधी करण्यात आला.
आयुष्यात सातत्याने प्रसिद्धीवर असलेल्या एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा अत्यंविधीचा शेवट मात्र कोरोनाच्या महामारीमुळे प्रसिद्धीपासून लांब राहिले. प्रत्येक रसिकांच्या मनात संगीताद्वारे अधिराज्य गाजविणार्या या गायकाचे मात्र शेवटचे अंत्यदर्शन घेता आले याची रुखरुख मात्र संगीत रसिकांना लागून राहिली.
Comments
Post a Comment