Posts

संगीतावर अधिराज्य गाजविणारा गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम

Image
श्रीपती पंडितराधुला बालसुब्रह्मण्यम या नावाने फारशे लोक परिचित नसतील परंतु एस.पी. बालसुब्रह्मण्यम हे नाव मात्र प्रत्येकाच्या मनी असायलाच हवे.  एसपी बालसुब्रह्मण्यम, एसपीबी किंवा बालूू म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय पार्श्वगायक, दूरदर्शनचे प्रस्तुतकर्ता, संगीत दिग्दर्शक, अभिनेता, डबिंग कलाकार आणि मुख्यत्वे तेलुगू भाषेत काम करणारे चित्रपट निर्माता होते. 4 जून त्यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने हा लेखनप्रपंच. 4 जून श्रीपति पंडितराध्याय बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म दिवस. जन्म 1946 सालचा. आध्रं प्रदेश नेल्लोर येथे झाला. वडील एस.पी. सांबमूर्ती किर्तनकार म्हणून परिचित होते. त्यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असा परिवार. पत्नी सावित्री. एस.पी. एक मुलगा पी.बी. चरण आणि मुलगी पल्लवी. बहिण एस.पी. शैलजा ही देखील गायिका. तिचा विवाह शुभलेखा सुधाकर या अभिनेत्यासोबत झाला. लहानपणापासून एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना इंजिनिअर होण्याची इच्छा होती. परिवाराची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांचा ओढा इंजिनिअरकडे होता. त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजी युनिर्व्हर्सिटीमध्ये प्रवेशही घेतला...